सहकारी संस्था
कॉ. मुरलीधर (मास्तर) नवले सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, नवलेवाडीता. अकोले, जि. अहमदनगर
र. नं.:ANR/AKL/AGR/OD/3586/2001                                         
र. तारीख: २३/११/२००१
      शेती बरोबरच जोडधंदा म्हणून नवलेवाडीतील ग्रामस्त परंपरागत दूग्ध व्यवसाय करतात. आजच्या यांत्रिक युगामध्ये दूग्ध व्यवसायाने खुप प्रगती केली आहे. नवलेवाडीतील शेतकर्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत दूग्ध व्यवसायात लक्षणीय प्रगती केली आहे.
      शास्त्रोक्त चाचण्या करुन दूध संस्थेत रोज सरासरी ८५० लीटर दूध स्विकारले जाते, व विशेष म्हणजे दूधाच्या दर्जावरती दूधाचा दर उत्पादकांना दिला जातो. संस्थेचे दूध संकलना पासुन सर्वच कामकाज संगणकीकृत केले जाते. संस्थेची स्वमालकीची अशी भव्य इमारत आहे.
|