सहकारी संस्था
श्री अगस्ती सामुदायिक विहीरीवरील सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित, नवलेवाडी.ता. अकोले, जि. अहमदनगर
र. नं.ANR/LFT/CW/13/74                                         
र. तारीख: १२/०३/१९७४
        नवलेवाडी गावाच्या उत्तरेस अंदाजे १ किमी. अंतरावरुन प्रवरा नदी वाहते. गावातील बर्याचशा कुटुंबाची शेती प्रवरा नदीच्या कडेलाच विखुरलेली आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवलेवाडी गावाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले व सामुदायिक विहिरींची खोदाई करण्यात आली. बैल मोटांच्या मदतीने शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत असे. काळ बदलत गेला व सामुदायिक विहीरीवर डिझेल इंजिन बसवून शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत असे.
        सन १९६७ च्या दरम्यान विद्युत मोटारींवर शेती करण्यास प्रारंभ झाला, तर १९७४ मध्ये प्रवरा नदीवरुन पहिली सामुदायिक उपसाजलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. तिचे स्वरुप व्यापक करत सन १९८३ मध्ये अगस्ति उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करत नवलेवाडी गावचे संपूर्ण २५० एकर क्षेत्र ओलिताखाली आले, तेथूनच गावच्या प्रगतीला खर्या अर्थाने सुरुवात झाली. नवलेवाडीची शेती बारमाही बागायती झाली.
        आजपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात अखंड व नियमीत चालणारी जलसिंचन योजना म्हणून नवलेवाडीच्या श्री अगस्ती सामुदायिक विहीरीवरील सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित, नवलेवाडी कडे पाहिले जाते.
|
|