नवलॆवाडी
NawalewadiZPSchool NawalewadiZPSchoolCompLab NawalewadiZPSchool NawalewadiZPSchool

जि.प.प्राथ. कॆंद्रशाळा, नवलॆवाडी.

ता.-अकोलॆ, जि.-अहमदनगर.

नवलॆवाडी गावाच्या लौकीकात भर घालणारी अजुन एक गोष्ट म्हणजॆ गावातील प्राथमिक शाळा!

शाळेला मिळालेले पुरस्कार:

  • सन १९९३: आदर्श शाळा पुरस्कार.
  • सन २००३-०४: साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार.

        नवलेवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे गुरुकुल असे जणू समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. नवलॆवाडीकरांच्या मानाच्या शिरपेचात अनेक तुरे खोवणार्या शाळेचा उल्लेख करणे म्हणूनच औचित्याचे ठरते.
        जिल्ह्याच्या किंबहुना राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आपल्या नावाचा मोठा दबदबा निर्माण केलेल्या येथील प्राथमिक शाळेची स्थापना १६ जुन १९४८ रॊजी झाली. सुरुवातीला ही शाळा एका गोठ्यात भरायची. पुढे एक खॊली झाली, गरजेनुसार वर्ग खॊल्यांचे बांधकाम झाले. पुढे शाळेला लाभलेल्या शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने बघता बघता शाळेचं रुपडं बदलून टाकलं.
        जेमतेम शंभरेक पटाची शाळा वाढत वाढत तब्बल सातशे-साडेसातशे पटसंख्येपर्यंत पॊचली. चार शिक्षकांच्या जागी आज १६ शिक्षकांची ‘टिम’ काम करतेय. पण हे सारं काही सहज शक्य झालेलं नाही. याच्या मुळाशी गावातील धुरीणांनी केलेल्या प्रयत्नांना याचं संपुर्णपणाने श्रेय जातं. नवलेवाडीच्या ग्रामशिक्षण समितीने ज्या तर्हेने कार्यरत राहुन शाळेला दिशा दिली, महाराष्ट्रात हा एक विशेष शैक्षणिक पॅटर्न ठरावा.
ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, मार्गदर्शन शिक्षकांची मेहनत, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचा प्रतिसाद यातून गुणवत्तेचा नवलेवाडी पॅटर्न आकारला आहे. विशेषत: पूर्वमाध्यमिक(इयत्ता-चौथी) शिष्यवृत्ती परिक्षेतील उज्ज्वल यशाच्या परंपरेने ही गुणवत्तेची पताका राज्यभर शिक्षणाच्या पंढरीत मोठ्या डौलाने फडकत ठेवली आहे. आजवर शाळेतील तब्बल ३०७(राज्यस्तरीय शिष्यवृत्ती-१५२, जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती-१५५) मुले शिष्यवृत्तीच्या गुणवत्तायादीत चमकले आहेत. मोजक्याच खोल्यांत भरणारी शाळा आता दिमाखदार दुमजली इमारती मध्ये भरते आहे.
        काळ बदललाय, शाळाही तशी बदलते आहे. जिल्ह्यात संगणक शिक्षणाची परंपरा आपल्याच शाळेने सुरु केली आहे, याला इतिहास साक्षी आहेच. यापुढेही संगणकाचा अध्यापनात प्रभावी वापर करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक, गावकरी प्रयत्नशील आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत निरनिराळे उपक्रम राबविले जातात. शाळेने कमावलेल्या विश्वासार्हतेमुळे पालक आपली मुले या शाळेत पाठवितात आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल निर्धास्त राहतात, ही गोष्ट उल्लेखनीय आहे. राज्यभरातल्या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक (इ. १ते४) शाळांच्या तुलनेत नवलेवाडी शाळेची पटसंख्या विशेष लक्षणीय आहे, हे येथे आवर्जुन नमुद केले पाहिजे.
        गावाचं नेतृत्व करणार्या मार्गदर्शकांसह तरुण पिढीतील कार्यकर्त्यांनी शाळेच्या जडणघडणीपासून आजवरच्या वाटचालीत दिलेले नि:स्पृह योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. शाळेला लाभलेल्या गुणवान शिक्षकांनी येथे गुणवत्तापुर्ण शिक्षणाची परंपरा अबाधित ठेवली आहे. यापुढील काळात शाळेच्या कर्तृत्वाचा वेलू वाढत, बहरत राहील याविषयी शंका नाही, म्हणूनच म्हणता येईल -

नवल वाटावे, अशी नवलेवाडीची शाळा!!!!!!

ग्रामशिक्षण समिती जि. प. प्राथमिक शाळा नवलेवाडी

ता. अकोले, जि. अहमदनगर

सदस्यांचे नाव पद
श्री. किशोर दगडू काठे. अध्यक्ष
श्री. विक्रम मधुकर नवले. उपाध्यक्ष
श्री. मधुकरराव लक्ष्मण नवले. सदस्य
श्री. बायजीबुवा बाळाजी नवले. निवृत्त शिक्षकसदस्य
श्री. आनंद निवृत्ती नवले. सदस्य
श्री. रामकृष्ण नामदेव नवले. सदस्य
श्री. विलास भिकाजी नवले. सदस्य
श्री. येल्हुबा दादा नवले. सदस्य
श्री. लक्ष्मण गणपत नवले. सदस्य
श्री. सिताराम दगडू आरोटे. सदस्य
श्री. आंबरे. सदस्य
श्री. पी. जी. गोडसे. सदस्य
श्री. मनोज आनंदा गायकवाड. सदस्य
श्री. गणपत महादू भवारी. सदस्य
श्री. नारायण माधव झोळेकर. सदस्य
श्री. राकेश विजय देशमुख. सदस्य
श्री. कैलास झुंबर नवले. सदस्य
सौ. प्रतिभा भास्कर घुले. सदस्या
श्री. अशोक माधव बिडवे. सचिव

Top 

Site Designed by-Rahul Nawale.

All logos, trademarks and content in this site are property of their respective owners. Posts and comments are the property of their posters. All else is © Copyright 2013.