निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत नवलेवाडी
प्रस्तावना
        नवलेवाडी गांव, अकोले शहरापासून अवघ्या २ किमी अंतरावर कोल्हार-घोटी रस्त्यालगत वसलेले क्रांतीकारी इतिहासाला साक्ष देणारं एक निर्मळग्राम!
स्वातंत्र्यपूर्व काळापासून लागलेला विकासाचा ध्यास गावाने अजुनही जपलेला आहे. गावाच्या विकासासाठी दि. ०७/०७/१९९३ रोजी स्वतंत्र्य ग्रामपंचायतची स्थापना झाली.
        ‘ग्रामपंचायत नवलेवाडी’ गावाच्या इतिहासाला साक्ष देत शासनाच्या विविध योजना राबवून गावाच्या विकासाचे ध्येय्य अविरत चालू ठेवले आहे आणि शासनाचे पुरस्कार देखील पटकावलेत, हे सर्व गावातील एकीचे बळच म्हणावे लागेल. ग्रामपंचायत नवलेवाडीच्या स्थापनेपासून तो आजपर्यंत सर्वच्या सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होऊन, सरपंच, उपसरपंच देखील बिनविरोधच निवडलेले आहेत. अशारीतीने खर्याअर्थाने समाजाला एक नवा आदर्श घालुन देणारी ही आदर्श ग्रामपंचायत म्हणूनच सर्वत्र ओळखली जाते.
|
   |
ग्रामपंचायत नवलेवाडीची अल्पशी ओळख:
- ग्रामपंचायत स्थापना:- दि. ०७/०७/१९९३
- गावाची लोकसंख्या:- सन २०११ च्या जनगणनेनुसार-
-   एकुण: ३७८२
-   पुरुष: १९४०
-   स्त्रिया: १८४२
|
|
|