शेतीविषयक माहिती
        आपला भारत देश ‘कृषीप्रधान’ देश म्हणूनच ओळखला जातो. नवलेवाडी गावची संपूर्ण शेती बागायती असल्याकारणाने सर्वांचाच मुख्य व्यवसाय ‘शेती’ असणे स्वाभाविकच आहे.
बाराही महिने मुबलक पाणी पुरवठा व बागायती क्षेत्र असल्याने प्रामुख्याने भाजीपाल्याची पिके घेण्याकडे सर्वांचाच कल जास्त आहे. कांदा, टोमॅटो, ऊस या पिकांबरोबरच आता डाळींबाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो पिकाचे तर बाराही महिने विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आमच्या नवलेवाडी गावात आहेत. मुंबई, नाशिक, संगमनेर व अकोले च्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीस पाठविला जातो.
        ‘अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा’ व ‘पाणी व्यवस्थापनाचा’ योग्य तो वापर करुन कमी क्षेत्रात जास्तीत जास्त पिक व उत्पन्न घेऊन नवलेवाडीतील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ व सक्षम झाले आहेत.
अनेकांनी शेतीत प्रगती करुन तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठे व्यापार, व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत नाही. अशा ह्या प्रगतशील शेतकर्यांची मुले उच्चशिक्षित होऊन त्यांनी आपले मोठमोठे व्यवसाय थाटले असून, काही तरुण उच्च पदस्थ नोकर्यांमध्ये सर्व क्षेत्रात अधिकार पदावर काम करीत आहेत.
नवलेवाडीकरांचे शेतीचे क्षेत्र:
नवलेवाडी, अकोले, आगार, खानापूर, टाकळी, औरंगपूर, उंचखडक, धुमाळवाडी ह्या शिवारात शेती विभागलेली आहे.
एकूण क्षेत्र: १५० हेक्टर, संपूर्ण क्षेत्र बारमाही बागायती.
पाटपाण्याची व्यवस्था: ‘श्री अगस्ती सामुदायिक विहीरीवरील सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित, नवलेवाडी’ व वैयक्तिक विहीरी.
गावातील एकूण विहीरी:२८
गावातील प्रमुख पिके: डाळींब, ऊस, टोमॅटो, कांदा, गहू, बाजरी, सोयाबीन व वेळोवेळी हंगामानुसार घेतली जाणारी भाजीपाला पिके इ.
|
|